नाशिक : ‘कोणी चाणक्य बिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नाही,’ अशी प्रतिक्रिया अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिकमधील येवला मतदारसंघात नवीन बांधण्यात आलेल्या तालुका पोलीस प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ही प्रतिक्रिया दिली.
भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज कोकणात दौरा आहे. यापूर्वी खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल. भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भुजबळांनी ‘कोणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. ज्यावेळी जनता सरकारला स्विकारते, तेव्हा कोणी हात लावू शकत नाही,’ असे भुजबळांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- देशाची दिशा बदलणारा अर्थसंकल्प – सीतारामन
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


