मुंबई : संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर करून आठवडा उलटला आहे. कोरोना नंतरचा अनेक अपेक्षा असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये विकासासाठी अनेक योजना आणल्या असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. तर विरोधकांकडून मात्र, या अर्थसंकल्पामध्ये अनेक त्रुटी असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेवून अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली आहे.
आज निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. ‘सर्वस्पर्शी अर्थसंकल्प’ या कार्यक्रमास त्या उपस्थित होत्या. सीतारामन आपल्या या दौऱ्यात मुंबईतील उद्योगपतींची भेट घेऊन, त्यांचे अर्थसंकल्पाबाबतचे मत जाणून घेतले आहे. या कार्यक्रमाला ‘आयएलसी’चे अध्यक्ष राजीव पोद्दार, ‘बीएससी’चे सीईओ आशिषकुमार चौहान यांच्यासह भाजपचे काही नेते उपस्थित होते.
‘अर्थसंकल्प नक्कीच आव्हानात्मक असून, या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कोरोनाचा सर्वांनाच फटका बसला आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कोणताही टॅक्स वाढवू नये असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले होते. सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. देशाला आत्मनिर्भर बनवणारा हा अर्थसंकल्प आहे’, असे म्हणत देशाची दिशा बदलणारा हा अर्थसंकल्प असल्याचा दावा निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
अर्थसंकल्पात छुप्या मार्गाने जनतेवर कर लावण्यात आल्याचा आरोप केले जात आहेत. त्यावरही सीतारामन यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिले आहे. जनतेवर कोणताही छुपा करत लावण्यात आलेला नाही, जे असा आरोप करत आहेत त्यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्प पाहावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


