Share

पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह

Published On: 

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शाहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.

भाजपचे बडे नेते एकत्र आले असून हा कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राज्यातील राजकारणावर हे नेते काय भाष्य करणार याची उत्सुकता वाढली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपपूर्वी फासे बदलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमित शाह राज्यात आल्याने ऑपरेशन लोटस चा मुहूर्त ठरणार का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली आहे. ‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं रिक्षेसारखं सरकार आहे. या रिक्षेची तीनही चाकं वेगवेगळ्या दिशेला जातात. निवडणुकांमध्ये पवित्र जनादेश तोडून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं तीनचाकी सरकार स्थापन झालं. सत्तेच्या लाचारीचा अपवित्र गठबंधन करण्यात आलं,’ अशी टीका शाह यांनी महाविकास आघाडीवर केली.

तर, ‘नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळालं होतं. आम्ही वाचनावर ठाम राहणारी लोकं आहोत. असं खोटं बोलत नाही. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी जास्त जागा लढवल्या. आमचा शब्द होता, एनडीएचं सरकार आलं तर नितीश कुमारच मुख्यमंत्री बनतील. यानंतर भाजपला जास्त जागा मिळाल्या. त्यांनी रजनीतीचं भान राखून भाजपचा मुख्यमंत्री करा असं सांगून टाकलं. मात्र, आम्ही दिलेला शब्द पाळला,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!