Share

‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’

Published On: 

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शाहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.

भाजपचे बडे नेते एकत्र आले असून हा कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राज्यातील राजकारणावर हे नेते काय भाष्य करणार याची उत्सुकता वाढली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपपूर्वी फासे बदलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमित शाह राज्यात आल्याने ऑपरेशन लोटस चा मुहूर्त ठरणार का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. पुढे त्यांनी भाजपसोबतची युती सोडताना शिवसेनेनं केलेल्या आरोपांवर देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती. यावेळी, त्यांनी समान सत्तावाटप व मुख्यमंत्री पदाबाबत देखील शब्द दिल्याचं उद्धव ठाकरे व शिवसेनेतर्फे कडून सांगण्यात आलं होतं. भाजपने शब्द न पाळल्याने शिवसेनेनं युती तोडल्याचं सांगण्यात येत होतं.

उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नेमकं अमित शाह व त्यांच्यामध्ये बंद खोलीत काय झालं होतं याच्या दुसऱ्या बाजूवर अमित शाह यांनीभाष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!