मुंबई : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, ‘मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते’ असे विनंती त्यांनी केली आहे.
यावर रुपाली चाकणकर यांनी आता रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आता विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकरांना टोला लगावला आहे.
याबाबत बोलताना दरेकर म्हणाले कि, ‘सध्या महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या थराला गेले असल्याचे पहायला मिळत आहे. विशेषतः या महाविकास आघाडी सरकारचे कुठलेही नियंत्रण कायदा सुव्यवस्थेवर नाहीये. आता १०० प्रकरणे त्यांचे निघाल्यावर असा कोणतातरी व्हिडिओ बाहेर काढायचा आणि त्यावर गलिच्छ दर्जाचे राजकारण त्यावर करायचे असे काम चालू आहे.
कोणताही पक्ष असला तरी चुकीच्या गोष्टी या चुकीच्याच असतात त्याच समर्थन कोणीही करू शकत नाही. रुपाली चाकणकर यांनी पहिले त्यांच्या पक्षातील मेहबूब शेख पासून अनेक नेत्यांचे कारनामे काय आहेत ते पहिले तपासून घ्यावे.’ असा टोला त्यांनी चाकणकरांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनेचे गंभीर आरोप, रामदास तडस यांना तात्काळ अटक करा ; रुपाली चाकणकरांची मागणी
- उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले यांना समजतं का?, मनसेचा संतप्त सवाल
- राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने ! ‘मुख्यमंत्र्यांशिवाय चिपी विमानतळाचे उद्घाटन शक्य’
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे

