परभणी : ग्रामीण भागातील जे नागरिक कोविड – १९ ची लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत, अशा नागरिकांच्या घरी जाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी लसीकरण केले. ११ ऑक्टोबर रोजी पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे या ग्रामपंचायतीमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ तसेच ‘मिशन कवचकुंडल’ विशेष मोहिम कार्यक्रमानिमित्त टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी वैयक्तिक स्वछता राखावी, घरोघरी जाऊन लसीकरण करावे, घराचा आणि गावाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लसीकरणा बाबत केवळ मार्गदर्शन न करता गावातील जे लोक मुद्दामहून लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत अशा नागरिकांच्या प्रत्यक्ष घरीच जाऊन स्वतः शिवानंद टाकसाळे यांनी लसीकरण करून घेतले. तसेच लसीकरणाबाबत वयोवृद्ध नागरिकांचे जे गैरसमज आहेत ते आपल्या ग्रामीण बोलीतून टाकसाळे यांनी दूर केले. उशिरा पर्यंत २१५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून पुढील प्रक्रिया सुरूच होती.
यावेळी लसीकरणामुळे कोविडचा धोका कमी होतो सण – उत्सव परत येतील पण गेलेले आरोग्य परत येणार नाही. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने लसीकरण करावे. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार’, पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- आघाडीच्या सर्वच नेत्यांची उस्मानाबादेत रॅली मात्र, बंदला संमिश्र प्रतिसाद
- जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या; एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन
- ‘नेतेगिरीचा अर्थ कुणालाही फॉर्च्युनरने चिरडणे नाही,’ भाजपा नेत्याचा घरचा आहे
- देशात लोकशाही राहिली नाही असेच चित्र; खासदार फौजिया खान यांचा केंद्र सरकारवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

