Share

‘..तर मी संघाला वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवू देणार नाही’, शोएब अख्तरचा पाक क्रिकेट बोर्डाला विश्वास

Published On: 

मुंबई : एकेकाळी दिग्गज म्हणून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा बोलबाला होता. मात्र गेल्या काही वर्षापासून पाकिस्तान्या संघाला उतरती कळा लागली आहे. एक काळ होता जेव्हा पाकिस्तानच्या संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज होते. मात्र आता तीही गोष्ट पाकिस्तानच्या संघात राहिली नाही.

पाकिस्तान क्रिकेट संघात पडलेल्या गोलंदाजाच्या दुष्काळावर भाष्य करताना माजी खेळाडू शोएब अख्तर म्हणाला की ‘जर मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन झालो तर युवा गोलंदाजाना गोलंदाजीचे धडे देईन. आणि या गोष्टीची काळजी घेईन की पाकिस्तान क्रिकेट संघाना वेगवान गोलंदाजाची कमतरता भासु देणार नाही. पाकिस्तान संघातील शाहीन अफरीदी, नसीम शाह, हरीस रऊफ आणि मोहम्मद हसेन सारखे वेगवान गोलंदाज १४० किमीच्या वेगाने शोएब अख्तर जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत होता, तेव्हा तो १६१.३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता. परंतु शोएब अख्तरचा हा विक्रम आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने मोडलेला नाही.

वसिम आक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर यांचा वारसा लाभलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या वेगवान गोलंदाजाची कमी जाणवत आहे. काही वर्षापुर्वी मोहम्मद अमिर आणि मोहम्मद आसिफ यांनी ही कमतरता भरुन काढली होती. मात्र हे दोन्ही गोलंदाज सामना निश्चीतीप्रकरणी अडकले त्यामुळे दोघेही संघाबाहेर झाले. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या संघात अद्याप एकही वेगवान गोलंदाज नाहीये. यावर शोएब अख्तरने चेअरमनपदाची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!