Share

इंधन, गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर, केंद्र सरकारचा निषेध

Published On: 

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडर दरवाढ त्वरीत कमी करा, या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाभरात आंदोलन करत केंद्रातील भाजप सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपुत, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले.

कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी सर्व जण अडचणीत सापडलेले आहेत. त्यांना दिलासा देण्याची गरज असतानाच त्यांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न वाढविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरची भरसाठ झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबर मोडले. दरवाढीमुळे महागाई वाढत असून सर्वसामान्यांना जगण अवघड झाले आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. इंधन दरवाढ कमी झाली पाहिजे यामागणीसह केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

चुलीवर स्वयंपाक करत महिला कार्यकर्त्यांन इंधन व गॅस सिलिंडर दरवाढीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनदरम्यान, काही कार्यकर्त्यांनी बैलगाडी आणली. त्यात आमदार दानवे यांच्यासह काही शिवसैनिक बसले व त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. थोड्यावेळाने नेते व कार्यकर्ते मंडळी बैलगाडीतून उतरत नाही तोच एक बैल उधळला. परंतू चालकाने त्यावर तातडीने नियंत्रण मिळविले आणि पुढील अनर्थ टळला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!