🕒 1 min read
मुंबई: मुंबईतील ताडदेव भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज(२२ जाने.)सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तर आता केंद्र सरकारनेही मदतीचा हाथ पुढे केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने या दुर्घटनेनंतर जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असे राजकारण आता रंगताना दिसून येत आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the building fire in Tardeo, Mumbai. The injured would be given Rs. 50,000 each: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 22, 2022
दरम्यान या दुर्घटनेनंतर नजीकच असलेल्या मसिना आणि व्होकार्ट रुग्णालयाने जखमींवर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे वादंग निर्माण झाला होता. यावरच महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन्ही रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेवरून आता भाजपकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमृता फडणवीस यांनी आपलं मुंबई शहर, आपल्याच डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होतंय. उत्तुंग इमारतींमधील सदोष पायाभूत सुविधांमुळे आपण घरात मृत्यमुखी पडत आहोत. सरकारी रुग्णालयांमध्ये नियमांचे पालन होत नसल्यामुळे आपला जीव जात आहे. तर रस्त्यावर खड्डे आणि गोंधळ असल्यामुळे अपघातांमध्ये आपला जीव जात आहे. या सगळ्याला जबाबदार कोण, अस सवाल केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री आणि तोही काँग्रेसमधून आयात केलेला”
- नाना पाटेकरांचा अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव! म्हणाले, “त्याला कधीही…”
- “देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवरायांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल”
- सैफ अली खानच्या मुलाची ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीच्या मुलीसोबत डिनर डेट, फोटो व्हायरल
- “स्व. अटलजी, मुंडे साहेब आणि पर्रिकरांची भाजप राहली नाही”, उत्पल पर्रिकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली पाटलांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
