टीम महाराष्ट्र देशा; ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीला एकवर्ष पूर्ण होत आहेत. नोटाबंदीनंतर देशाच नुकसान झाल्याचा आरोप करत विरोधकांनी काल काळा दिवस साजरा केला. तर सरकार नोटाबंदी देशाच्या हिताची असल्याचं सांगत आहे.
दरम्यान आता नोटबंदीच्या वर्षपुर्तीवर सरकारकडून एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून जिंकण्याऱ्यांना लाखोंची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी चार कॅटेगरी असणार आहेत, ज्यामध्ये
१) १२०० शब्दांत नोटबंदीच्या आठवणी, नोटबंदीचे फायदे सांगाण्याचा निबंध,
२) काळा पैसा आणि करप्शन यावर एखादं क्रिएटिव्ह आर्टवर्क, कॅरिकेचर, कार्टून पोस्टर
३ ) काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील सरकारचं काम यावर एक व्हिडिओ
४ ) काळा पैसा आणि त्याविरोधातील सरकारच्या लढाईवर कविता
या स्पर्धे संदर्भातील सर्व माहिती http://mygov.in या वेबसाईटवर उपलब्द आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

