🕒 1 min read
नवी दिल्ली: पूर्वेकडील सीमेवर भारताला चीनशी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे, मात्र तरीही केंद्र सरकार सीमावादावरील प्रश्नावर संसदेत चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांनी केला आहे. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी कोरोना लसीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, इंधन दरवाढ, महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले.
देशाच्या सीमांवर आव्हानात्मक परिस्थिती असताना संसदेत चर्चा करण्याची संधी न देण्याची केंद्र सरकारची भूमिका अत्यंत चुकीची आहे. या प्रश्नावर संसदेत चर्चा झाली तर आव्हानांना तोंड देण्याची सामूहिक इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींना व्यक्त करता येऊ शकते. पण, केंद्र सरकारला अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नसावीत. मात्र चीन वा अन्य सीमावादासंदर्भात प्रश्न उपस्थित करणे विरोधी पक्षांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच मोदी सरकारने या प्रश्नावर संसदेत सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
दरम्यान सोनिया गांधी यांनी लसीकरणावरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले होते, मात्र या उद्दिष्टांच्या जवळपासही केंद्र सरकार पोहोचलेले नाही. ६० टक्के लोकसंख्येनेही कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या नाहीत. असा दावाही सोनिया गांधी यांनी केला आहे. तसेच तीन कृषी कायदे करतानाही केंद्राने चर्चा केली नाही, आता हे कायदे मागे घेतानाही केंद्राने चर्चा करण्यास नकार दिला. लोकशाही परंपरेला बगल देऊन केंद्र सरकार सातत्याने काम करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
