Share

“गॅस सिलेंडर कमरेला बांधा, डिझेल-पेट्रोल काखेत घ्या…”, सदाभाऊंचा महाविकास आघाडीवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्र सरकारने इंधनावरील कर कपातीचा निर्णय घेतला आहे. कर कपातीनंतर आज पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झाल्याची दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून भाजपकडून आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवरच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

“गॅस सिलेंडर कमरेला बांधा, डिझेल-पेट्रोल काखेत घ्या.. महविकास आघाडीवाल्यांनो जरा कांद्याचा ज्यूस प्या. केंद्र सरकारनं घेतलेला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह. पण आमची वसुली चालूच राहील हा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतलेला आहे.”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून कपात होऊन डिझेलचे भाव प्रति लिटर 89.62 झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून आता ठाकरे सरकारवर इंधनदरवरून टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!