🕒 1 min read
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला आज अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोहून अधिक अनुयायी येतात. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच अभिवादन करण्याचे अनुयायांना राज्य सरकारने आवाहन केले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोरेगाव-भीमाला पोहोचले असून त्यांनी शौर्यदिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन केलं आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, फक्त आदेश काढण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
आतापर्यंत मुंबई लोकल सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नसल्याचेही ते म्हणाले. ते एल्गार परिषदेबाबत बोलताना म्हणाले की, कोळसे पाटलांना एल्गार परिषद घ्यायची असेल तर त्यांनी घ्यावी. मला आणि न्यायमूर्ती पी बी सावंतांना, जी घ्यायची होती ती आम्ही घेतली आणि त्याचा उद्देश देखील साध्य झाल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- औरंगाबादमध्ये आता काँग्रेसचा महापौर बसवा; शिवसेनेच्या सत्तेला थोरातांचं थेट आव्हान
- पुणेकरांसाठी खुशखबर : PMPML च्या ताफ्यात दाखल होणार नव्या १५० ई-बसेस!
- ‘सोनिया गांधींचे नामांतर चालते मग औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही ? ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
