🕒 1 min read
जालना : जालना आणि परभणी या मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून या रस्त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भात शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले होते. मात्र, आता निधी मंजूर झाल्याने त्या आश्वासनाची पूर्तता झाली, असे म्हणता येईल. वाटुर फाटा ते चारठाणा असा २७ किलोमीटर लांबीचा हा रस्ता दोन्ही जिल्ह्यांना जोडतो. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत होईल आणि वाहन धारकांचा वेळ वाचेल.
दिलेल्या शब्दाला जागणारा नेता ही गडकरी यांची ओळख असून यातून हे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी गडकरी तसेच केंद्र सरकार यांचे आभारही मानले आहेत. या रस्त्यामुळे मराठवाड्यातून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहतूकीस फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


