परभणी : बोरगाव (ता.सेलू) येथील शेती आखाड्यावर सेलू पोलिसांनी धाड टाकून 45 हजार रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. पोलिसांनी सर्व तालुक्यामध्ये गस्तीचे प्रमाण वाढवले असल्याने अश्या अनेक कारवाया पोलिस करत आहेत.
सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोवर्धनदास भुमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे, कर्मचारी सुनील वासलवार, बाळू पुरनवाड, रामेश्वर मुंडे, सय्यद रहीम आदींनी मिळालेल्या माहितीरून सातोना रस्त्यावरील बोरगाव शिवारातील शेत आखाड्यावर छापा मारला. त्यावेळी तेथे पत्राच्या शेडमध्ये भुश्याखाली लपवून ठेवलेली दारू जप्त केली.
त्यात दारूचे 18 बॉक्स ज्याची किंमत 44 हजार 928 रुपये तसेच एक मोटारसायकलही जप्त केली. असा एकूण 65 हजार 928 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन तसेच कोरोनाच्या काळामध्ये खुप मोठया प्रमाणात दारु, गांज्या ची चोरी तसेच चोरीची विक्रीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आता पोलिसांना लॉकडाऊन तसेच कोराेनाच्या परिस्थितीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात ताण वाढलेला आहे. पोलिसांनी ही वाढती गुन्हेगारी विषयांमध्ये विशेष पथके स्थापन करुन गस्त वाढवणे, चोरींच्या घटनांवर काम करणे मोठ्या प्रमाणात वाढवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
