Share

CBI Raid | ६ तासांपासून CBI सिसोदियांच्या घरी; लॅपटॉप, मोबाईलसह आणखी काही वस्तू जप्त

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबाबत सीबीआयचे पथक घरी पोहोचल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. तर गेले ६ तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपासणी आणि शोधाशोध करत आहे. वृत्तानुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सिसोदिया आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

या कारवाईनंतर आप आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचं काम रोखण्यासाठी ही कारवाई केल्याचे आपने म्हटले आहे. दुसरीकडे भाजपचा आरोप आहे की, पंजाब निवडणुकीपूर्वी केजरीवाल आणि दारू माफिया यांच्यात डील झाली होती. दरम्यान यासंदर्भात सीबीआयने एफआयआर नोंदवली आहे. ज्यात सिसोदिया यांच्याव्यतिरिक्त, आणखी 4 लोकांची नावे आहेत. ज्यात उत्पादन शुल्क उपायुक्त आनंद तिवारी, तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, कुलजीत सिंग, सुभाष रंजन यांच्या घरावरही सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. ही कारवाई गेल्या ६ तासांपासून सुरूच आहे.

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर वीके सक्सेना यांच्या आदेशानुसार ही सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या अहवालात नवीन धोरणामुळे दारू परवानाधारकांना फायदा झाल्याचे म्हटले आहे. या अहवालात मनीष सिसोदिया यांचे नाव होते. हा अहवाल एलजीला सादर करण्यात आला आणि हि कारवाई करण्यात आली.

सिसोदियांनी केले ट्विट

मनीष सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, मी सीबीआयचे स्वागत करतो. तपासात मी पूर्ण सहकार्य करणार आहे. जेणेकरुन सत्य लवकरच बाहेर येईल. आतापर्यंत अनेकदा माझ्यावर केस केल्या गेल्या, मात्र काहीच समोर आलं नाही. यावेळीही असंच होणार, असा दावा त्यांनी केला. तसेच ते असेही म्हणाले कि, आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. आपल्या देशात चांगले काम करणार्‍यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश नंबर वन झाला नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!