मुंबई : ‘सैराट’ या चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी झालेली नाही. रिंकू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. आता ‘सैराट’ फेम आर्चीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राज राजगुरूची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिंकूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा पारंपरिक पोशाखातला फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलं.
‘छत्रपती शिवराय हे नावंच सर्वसमावेशक आहे. जात महत्त्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्त्वाचे आहे. स्वार्थासाठी नाही तर स्वराज्यासाठी लढणे महत्त्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता’, असं तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. रिंकूच्या या पोस्टला अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकसह अनेकांनी लाइक केलंय.
https://www.instagram.com/p/CLdftxwpa9j/?utm_source=ig_web_copy_link
‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून रिंकूने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आजही या चित्रपटाचं वेड तरुणाईमध्ये दिसून येतं. यामध्ये आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू सध्या कलाविश्वात सक्रिय असून वेब विश्वातही तिने तिचं नशीब आजमावलं. रिंकू आता लवकरच ‘झुंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- जालना जिल्हा रुग्णालयात ओपीडीनंतर आयपीडीही सुरू; शस्त्रक्रिया विभागही सुरू होणार
- ‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा ; भाजपची पटोलेंवर जहरी टीका
- भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक; अपघातात दुचाकीवरील दोघे ठार


