Share

फिरायला गेलेल्या गर्भवती महिलांना उचलून जबरदस्तीने बसवलं वाहनात 

Published On: 

🕒 1 min read

वाशिम : काल सोलापूर जिल्ह्यात  जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन करण्याचा प्रताप केला होता आता फिरायला गेलेल्या गर्भवती महिलांना उचलून जबरदस्तीने  वाहनात बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्यात घडला आहे.उघड्यावर शौचाला न बसूनही गर्भवती महिलांवर कारवाई केल्यामुळे गुड मॉर्निंग पथकासह गट विकास अधिकाऱ्यांवर विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे एकूणच गुड मॉर्निंग पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या उपक्रमावेळी वाशिममधल्या मेडशी गावात गुड मॉर्निंग पथकाने शौचाला उघड्यावर बसलेल्या नसतानाही दोन गर्भवती महिलांनाही जबरदस्तीने उचलून नेलं.गरोदर महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर मालेगाव पोलिसात पुष्पलता अफूने, दत्ता चव्हाण, सुखदेव पडघान, इंगोले आणि मालेगाव येथील गट विकास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे महिलांनी पथकाच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाआहे .

काल सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन करण्याचा प्रताप केला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे .या प्रकाराबद्दल सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!