Share

मुलगा असलो तरी चुकीला माफी नाहीच; वडिलांनी मुक्ताफळे उधळल्यावर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Published On: 

रायपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्या विरोधात राजधानी रायपूरमध्ये एक FIR दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांना ‘उपरे’ (बाहेरचे) म्हटलं होतं. बघेल यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समुदायानं आक्षेप घेत रायपूरच्या डीडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी अलीकडेच ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले, तसेच ब्राह्मणांना आपल्या खेडय़ात प्रवेश करू देऊ नका असेही सांगितले.

दरम्यान वडिलांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, अशा शेरेबाजीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. आपल्या राजवटीत कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असे ते म्हणाले.

“कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षीय वडील असले तरी…छत्तीसगड सरकार सर्व धर्म, प्रांत, समाज आणि त्यांच्या भावनांचा आदर करतं. माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सांप्रदायिक शांतता भंग झाली आहे. मलादेखील त्यांच्या वक्तव्यामुळे वाईट वाटत आहे,” असं भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!