Share

परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीचे रॅकेट सुरु होते; दिलीप छाब्रिया यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी केला आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध कार डिझायनर असलेले डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे

माझ्या डीसीपीडीएल कंपनीत 52 टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी, सीआययू युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरुन माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे.

परमबीरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असून सीआययू युनिटच्या अंतर्गत तपास येत असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी छाबरिया यांनी केली आहे. मुकेश अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोघांचं पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!