🕒 1 min read
चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग आता आपला वेळ जुन्या मिंत्रांसोबत घालवीत आहेत. शनिवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या सैन्यातील जुन्या मित्रांसाठी मोहाली येथील मोहिंदर बाग फार्महाऊसवर एक पार्टी आयोजीत केली होती. यावेळी त्यांनी गाणंही गायलं.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नुकताच भांगडा नृत्य करण्याचाही व्हिडीओ समोर आला होता. अभिनेत्री स्वरा भास्करनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी चर्चा झाली होती. आताही त्यांचा मित्रांसोबत गाणं गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राजकारणातून विलिप्त होत ते एक सुंदर वयक्तिक आयुष्य जगत आहेत, त्यामुळे त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर टीका करण्याचा अधिकार राजकारण्यांना नाही, अशा अनेक प्रतिक्रिया त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला येत आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग मित्रांसोबत खूप आनंदी दिसत होते. त्यांनी एनडीए ४७ तुकडीच्या आपल्या सर्व जुन्या मित्रांना मिठी मारुन स्वागत केले. सर्वांनी सैन्यातील आठवणी ताज्या केल्या. ‘ओ गोरे गोर..’ ही जुन्या हिंदी चित्रपटातील गाणे त्यांनी यावेळी गायले.
And there was more merriment….@capt_amarinder seemed in full mood to enjoy the moment. Listen in to him singing ‘O gorey gorey…’ from an old Hindi movie. pic.twitter.com/xbwEzBBCw5
— Raveen Thukral (@Raveen64) September 25, 2021
याबाबत अमरिंदर सिंग यांचे माध्यम सललागार रवीन ठुकराल यांनी ट्विटरवर याबाबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत १९५० मधील हिंदी बॉलिवूड चित्रपटातील ओ गोरे गोर… हे गाणे गायले. तसेच त्यांचे वर्गमित्र आशा सिंह मस्ताना यांनी ‘इधर कान कान उधर कंकर’ हे लोकप्रिय पंजाबी गाणे गायले.
And there was more merriment….@capt_amarinder seemed in full mood to enjoy the moment. Listen in to him singing ‘O gorey gorey…’ from an old Hindi movie. pic.twitter.com/xbwEzBBCw5
— Raveen Thukral (@Raveen64) September 25, 2021
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून चरणजित सिंग चन्नी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले. पंजाब काँग्रेसमधील अतंर्गत कलहामुळे काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर चरणजीत चन्नी यांनी मुख्यमत्री पदाची शपथ घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचंच धोतर सुटलंय; चंद्रकांत पाटील राऊतांच्या निशाण्यावर
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला
- भाजप आमदाराची वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
