औरंंगाबाद : अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इजाज खान अयुब खान (वय ५०, रा. शादीखाना उस्मानपुरा) याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या इजाज खान याच्या ताब्यातून पोलिसांनी १४ हजार रुपयांचा २ किलो ७४८ ग्रॅम गांजा व रोख ७०० रुपये जप्त केल आहे. अटकेत असलेल्या इजाज खान याला गुरूवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी दिले आहेत.
उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीपान धर्मे (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी दुपारी पावने एक वाजेच्या सुमारास आशुरखान्या येथे एक व्यक्ती पांढरी गोल टापी व पांढरा पैजामा घालून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानूसार, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या पथकाने सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास सापळा रचून इजाज खान याला पकडले. त्याची चौकशी केली असता सदर गांजा त्याला मुराद खान मेहबुब खान (वय २२, रा. आशुरखाना, उस्मानपुरा) याने विक्री करण्यासाठी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंनी उगाच फुशारक्या मारू नयेत’, विनायक राऊतांचा पलटवार
- एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला
- एट्रॉसिटी प्रकरण; करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
- भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हाला नाही; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
