Share

Jayant Patil | “दिल्ली वाऱ्या व अंतर्गत मतभेदातून जर्जर…” ; OBC आरक्षणावरुन जयंत पाटलांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला परवानगी मिळण्यापूर्वी ज्या ३६५ ठिकाणी निवडणुकीची अधिसूचना जारी केली होती. तेथे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होतील, असेही स्पष्ट केले आहे. त्या जागांसाठी नव्याने निवडणुकीची अधिसूचना जारी करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने असे केले तर तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

“एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन २५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. यावेळात केवळ दिल्ली वाऱ्या करणे, शिवसेनेच्या फुटीर गटातील मतभेट मिटवणे, त्यांच्या समजूती घालणे तसेच उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागल्याने निराश असणारा भाजप पक्ष या सर्व व्यापातून ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यास नव्या सरकारला वेळ मिळाला नाही”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

नव्या सरकारने ओबीसी आरक्षणाकडे लक्ष दिले असते तर-

जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने बांठिया समितीची नेमणूक केली. या बांठिया समितीने दिलेला अहवाल सुप्रीम कोर्टात मान्य होऊन देखील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळाले नाही. हे धक्कादायक आहे. दिल्ली वाऱ्या व अंतर्गत मतभेद यातून जर्जर झालेल्या नव्या सरकारने ओबीसी आरक्षणाकडे लक्ष दिले असते तर हे आरक्षण निश्चित मिळाले असते.”

जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत-

“महाराष्ट्रातील विविध भागात पूर परिस्थिती आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नाशिक असा अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नसल्याने लोकांसाठी मदतकार्यही व्यवस्थित होत नाही. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पण राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने जनतेच्या प्रचंड रोषाला हे सरकार सामोरे जात आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटात मदतकार्य करण्यासाठी कोणीही नाही हे मोठे संकट लोकांपुढे आहे,” अशी खंत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!