दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य अजूनही स्पष्ट झालेले नाही. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळणार कि त्यांना इतर कोणत्या राजकीय पक्षात सामील व्हावे लागणार हे लवकरच कळेल. मात्र यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक अनोखं वक्तव्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंदच होईल. मी त्यांचं टेबलावर उभा राहून स्वागत करेल”, असे रामदास आठवले आज म्हणाले आहेत.
सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बारा बंडखोर खासदारांच्या अपात्रतेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याचिका केली आहे. हे प्रकरण न्यायालयात जाण्याची देखील शक्यता आहे. यातच शिंदे गटाच्या विलीनीकरणासंदर्भात रामदास आठवले यांना विचारले असता ते म्हणाले कि,”जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पक्षात आले, तर मला आनंदच होईल. मी स्वतः त्या सर्वांचं टेबलावर उभा राहून स्वागत करेल”. मात्र शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, त्यामुळे शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक खुलासा केला. “सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरतील. दुसऱ्या पक्षात जाण्याची अनेक आमदारांची तयारी नाही. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”, असे राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Uday Samant | लीलाधर ठाकरे यांचा शिवसेना वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे – उदय सामंत
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदेंना घेरण्यासाठी गेम प्लॅन! १२ खासदारांना अपात्र करण्यासाठी याचिका
- Sushma Andhare | “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडतात”; सुषमा अंधारेंनी व्यक्त केल्या भावना
- Jayant Patil | …तर ती राजकीय आत्महत्या आहे – जयंत पाटील
- Shivsena MP | शिवसेना खासदारांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव! शिंदेंना घेरण्याची तयारी


