Share

संप मागे घ्या, चर्चेला या; परिवहन मंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर असताना त्यांच्या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजप आणि एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल पबर यांना या मुद्द्यावरुन वेठीस धरलं आहे. एसटी कर्मचारी अनिल परब यांच्यावर आक्रमक झाले आहेत. त्यावर आता अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून वारंवार सांगत आलो आहे. हा प्रश्न चर्चेतून सोडवला जाईल. विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे तो हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहेय. त्या व्यतिरीक्त आपले जे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी सतत दारं खुली आहेत. वारंवार आवाहन करत आहे. मात्र कर्मचारी एकाच मुद्द्यावर अडून बसले आहेत. जो मुद्दा समितीसमोर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे, असं अनिल परब म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचं जे काही म्हणणं आहे ते न्यायालयासमोर मांडावं आणि समितीचा जो अहवाल येईल, तो आमच्यावर बंधनकारक असेल, आज यासंदर्भातील बैठक  संध्याकाळी 5 वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना आपली बाजू मांडायला लावली आहे. ही बाजू ऐकून त्यावर अभ्यास करुन मुख्य सचिव हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

एसटी कामगारांच्या 28 युनियन आहेत. त्या सर्वांच्या प्रतिनिधींसोबत बसून सरकारनं कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त आणखीही कुठले मुद्दे असतील तर त्यावरही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण प्रत्येकाशी चर्चा शक्य नाही. त्यामुळं चर्चा नेमकी कुणाशी करायची हे कामगारांनीच सांगावं, असं अनिल परब म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!