🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊसावर सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले होते. मात्र या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसह 15 ते 16 राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिगटाने 55 रुपये प्रति टन अनुदान देण्याची शिफारस केली. त्यानुसार देशातील शेतकऱ्यांना 1500 ते 1600 कोटी रुपये मिळणार आहेत. आज अखेर महाराष्ट्रात साडे नऊशे लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 522 कोटी रुपये येतील. विशेष म्हणजे हे अनुदान हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा विचार चालू आहे. याआधी 2015-16 मध्ये ऊसावर सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यावेळी एका टन ऊसावर 45 रुपये इतकी सबसिडी केंद्र सरकारने मंजूर केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

