औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील तरुणाला ५० हजारांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्याने ६३ हजार ८४७ रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रियम जहा आणि सरदार जसपाल सिंग अशी कोलकात्यातील भामट्यांची नावे आहेत.
जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे विवेक फुलचंद लुटे (रा. गल्ली क्र. ३, पुंडलिकनगर, गारखेडा परिसर) यांचे डीटीडीसी या कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने मोबाइलवर ते ऑनलाईन कर्ज मिळविण्यासाठी वेबसाईट पाहत होते. त्यावेळी त्यांनी बजाज फिनशर या अ;ॅप ५० हजारांच्या कर्जासाठी अर्ज केला. तेव्हा बजाज फिनशर कार्यालयात नोकरीला असल्याची थाप मारुन कोलकाता येथील प्रियम जहा या भामट्याने लुटे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खात्याच्या क्रमांकाची मागणी केली.
या संपुर्ण कागदपत्रांची ऑनलाईन पुर्तता करताना भामट्याने प्रोसेसिंग चार्ज, टी. डी. एस. व सुरक्षीत ठेव अशी कारणे सांगत टप्प्याटप्प्याने लुटे यांच्याकडून ६३ हजार ८४८ रुपये फोन-पेव्दारे उकळले. लुटे यांनी कर्जाच्या रकमेची मागणी केली. तेव्हा आणखी पाच हजाराची मागणी केली. तर दुसरा भामटा सरदार जसपाल सिंग याने व्यवस्थापक असल्याची थाप मारुन पाच हजारांची मागणी केली. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच लुटे यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत तक्रारी अर्ज दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’


