मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या पार्श्ववभूमीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘टिपू सेनेचे चारित्र्य ओळखूनच एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिला’, असे भातखळकर म्हणाले.
टिपू सेनेचे चारित्र्य ओळखूनच MIM ने आघाडीचा प्रस्ताव दिला… pic.twitter.com/uwdBnjUoDi
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 19, 2022
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारांचे आहेत. जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही. एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो. तसेच राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही, संजय राऊत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “चला दापोली, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूयात”, किरीट सोमय्यांचा इशारा
- “औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?”- संजय राऊत
- “आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत”- चंद्रकांत पाटील
- ‘राजू शेट्टी भाजपसोबत येणार का?’; बघा काय म्हणाले फडणवीस
- एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली “ही” ऑफर!


