Share

रणपिसेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी २९ नोव्हेंबरला पोटनिवडणूक

Published On: 

मुंबई : काँग्रेसचे पुण्यातील आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने ही पोटनिवडणूक आघाडीसाठी कसोटीची ठरणार आहे.

शरद रणपिसे यांचे २३ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यात निधन झाले होते. रणपिसे हे २०१८ मध्ये विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत २७ जुलै २०२४ पर्यंत होती. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार ९ नोव्हेंबरला अधिसूचना जारी होईल. १६ नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.

उमेदवारी अर्जांची १७ नोव्हेंबरला छाननी होईल. अर्ज माघारीची मुदत २२ नोव्हेंबर अशी आहे. २९ नोव्हेंबरला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या दरम्यान मतदान होईल. तर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, या जागेसाठी माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांची नावे आघाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!