Share

‘…पण आम्ही मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडणार नाही’; ‘हे’ व्यंगचित्र होतंय व्हायरल

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये राज्यात महिलांसह मुलींवरील वरील अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण होत असून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई, पुणेसारख्या स्मार्ट सिटीमध्येच या गंभीर गुन्हांमध्ये वाढ होत असून इतर ठिकाणी अधिक असुरक्षिततेची भीती निर्माण होत असून अशा नराधमांना वेळीच चाप लावण्यासाठी कडक शिक्षा व सक्षम कायदा करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर देखील संतापाची लाट उसळली असून सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे. निलेश राणे यांच्या समर्थकांच्या ट्विटर अकाऊंट वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे एक व्यंगचित्र शेअर करण्यात आले आहे. यामध्ये तीन माकडांमध्ये या तिन्ही नेत्यांचे चेहरे लावण्यात आले आहेत.

https://twitter.com/meNrane/status/1436673039832207366?s=20

‘महाराष्ट्रात कार्यकर्ते, मंत्री पासून रस्त्यावर अल्पवयीन,अबलांवर बलात्कार झालेत पण आम्ही मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडणार नाही, त्याच खुर्ची साठी तर हा तमाशा फड उभा केला महाराष्ट्रात,’ असं ट्विट कॅप्शन देण्यात आलं आहे. तर, संजय राऊत, ‘मी राज्याच्या समस्यांवर काहीच बोलणार नाही. उद्धव ठाकरे, मी राज्याच्या समस्या ऐकून घेणार नाही. आदित्य ठाकरे, मी राज्याच्या समस्यांकडे पाहणार नाही,  कारण आमची तळमळ फक्त मुख्यमंत्रीपदासाठीच असं म्हटल्याचे व्यंगचित्रात दाखवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!