Share

‘…पण मग लोकांना दाखवायची गरजचं काय?”; हेमांगीचे नेटकऱ्याला सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंगी तिच्या विनोदी अंदाजामुळे लोकप्रिय आहे. तिच्या याच अंदाजामध्ये ती सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले. मात्र या ट्रोल करणाऱ्यांना तिने चांगलेच उत्तर दिले आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टनंतर तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी देखील हेमांगीला पाठिंबा दर्शवत प्रतिक्रिया दिली होती.

https://www.instagram.com/reel/CQQA-mglQE6/?utm_source=ig_web_copy_link

हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या शीर्षकाखाली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. पण असे झाल्यानंतर देखील तिच्यावर ट्रोलिंग करणे काही थांबले नाही, तर ट्रोल करणाऱ्यांना तीही  रोखठोक उत्तर देत आहे.

हेमांगी फिटनेसचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करते, तिच्या अशाच एका व्हिडीओला नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले की, ”Agree Love u r body पण लोकांना दाखवायची गरजच काय?” यानंतर हेमांगीनेही रोखठोक शब्दात त्या युजरला रिप्लाय दिला. यात तिने म्हटले होते की, Agree तुम्हांला पटलेलं नाही पण इथे कमेंट करायची गरजच काय?, असे म्हणत तिने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!