Share

…तरी भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही : मोहम्मद शमी

Published On: 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये  नवीन खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे भारतीय संघाचा सेकंड बेंच भक्कम आहे. असे मत भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याने व्यक्‍त केले आहे. नवीन खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यामुळे आता प्रमुख खेळाडू निवृत्त झाल्यानंतरही भारताचा संघ भक्कमच राहील, असा विश्वास शमीने दाखवला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शार्दुल ठाकूर, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या नवीन खेळाडूंना अनपेक्षितपणे भारतीय संघात संधी मिळाली आणि या सर्वांनी त्या संधीचे सोने करून दाखवलं आहे. आम्ही निवृत्त झालो तरीही आमचे वारसदार ठरलेले असतील. या नवोदित गोलंदाजांना जितकी जास्त संधी मिळेल, तितके ते अनुभवी होतील. एखादा चांगला गोलंदाज निवृत्त झाला तरी भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही, कारण भारतीय संघाचा सेकंड बेंच भक्कम आहे. संघनिवडीत त्यांना सातत्याने स्थान देण्यासाठी प्रयोग केले गेलेच पाहिजेत, असेही शमी म्हणाला.

शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, टी. नटराजन, शुभमन गिल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर या नवीन खेळाडूंकडे अफाट कौशल्य आहे. त्यांनी प्रत्येक संधीचा योग्य लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या रूपाने भारतीय संघाला भविष्यातील स्टार खेळाडू मिळाले आहेत, असेही शमी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!