Share

लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरूच

Published On: 

औरंगाबाद: शहरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा अंशत: लॉकडाऊन लावण्याचा हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सुविधांमध्ये येणाऱ्या एसटी आणि स्मार्ट सिटी बसेसला यात परवानगी असली तरीही प्रवासी संख्येनुसारच बाहेरगावच्या बसेस सोडण्यात येतील तर स्मार्ट सिटी बंद ठेवावी का याबाबत आयुक्तांशी बोलून निर्णय घेतला जाईल अशी माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली.

कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे अंशतः लॉकडाऊन तर शनिवारी आणि रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

एसटी बससेवा, शहर बससेवा अत्यावश्यक सेवा सुविधांमध्ये मोडल्या जातात. मात्र शनिवार रविवार कडक लॉकडाऊन असेल. या दोन दिवसांमध्ये प्रवासी संख्या पाहून बाहेर गावाला जाणाऱ्या बस सोडण्यात येतील.

तसेच रविवारी एमपीएससीची परिक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करुन ज्या ज्या ठिकाणी परिक्षा असेल त्याठिकाणी बसेस सोडण्यात येतील. अशी माहिती एसटी विभागाच्या वतीने देण्यात आली.

तसेच शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली शहर बससेवा या दोन दिवसांमध्ये बंद राहतील कि सुरु याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र शहरातील प्रवासीच नसतील तर बस सुरु ठेवण्यात काय फायदा त्यामुळे स्मार्ट सिटी बसही बंदच ठेवल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!