चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. या सामन्यात पुनरागमन करणारा डिकॉक स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या मदतीने संघाचा डाव सावरला. मात्र ४३ धावावर असताना रोहित बाद झाला. मात्र या खेळीद्वारे त्याने आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत २०२ आयपीएल सामन्यात ३१.३१ च्या सरासरीने ५२९२ धावा केल्या आहे. तर शिखर धवनने १७६ डावांत ५२८२ आणि वॉर्नरने १४२ डावांमध्ये ५२५७ धावा केल्या आहेत. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली ५९११ धावांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना ५४२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! यंदा देशात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज
- पहिला चेंडु टाकण्याआधिच हिटमॅनचा पाय मुरगळला; गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल
- कारखान्यांनी कामगारांसाठी क्वॉरंटाईन सेंटर उभारावे, जालना जिल्हादंडाधिकारी यांनी दिले निर्देश
- औरंगाबादेतून चाेरी झालेल्या कारमध्ये मनसुख हिरेनची हत्या, एटीएसच्या अधिकाऱ्याचा दावा
- हाताचे तुटलेले बोट असतानाही कमीन्सने रोहित-इशानला धाडले तंबूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

