🕒 1 min read
मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.
९ एप्रिल पासुन सुरु होत असलेल्या आयपीएल च्या सत्रासाठी विविध संघाचे सराव शिबीर सुरु झाले आहे. मुंबई इंडियन्सचे सराव शिबीर हे मुंबईतच आयोजीत करण्यात आले आहे. नुकताच रोहित मुंबई इंडियन्सच्या शिबीरात दाखल झाला. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावरुन याबद्दल माहिती दिली होती. रोहित व्यतिरीक्त या शिबीरात हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि सुर्यकुमार यादव हे दाखल झाले आहेत.
The tweet you all have been waiting for ????#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @Jaspritbumrah93 pic.twitter.com/kUz8woVM7q
— Mumbai Indians (@mipaltan) March 30, 2021
दरम्यान, टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह नुकताचं लग्न बंधनात अडकला. बुमराहने इंग्लंड विरुद्ध टी २० सामना मधीच सोडला होता. परंतु बुमराह आता आयपीएलमध्ये सामील होणार आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटर अकाउंटवर बुमराहचा वर्कआऊट करतानाच एक व्हिडिओ पोस्ट आहे. त्या व्हिडीओमध्ये बुमराह जोरदार तयारी करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भेद-नीतीचा प्रयोग करून काय साध्य होणार ?’
- ‘…तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली कधीच खेळू शकले नसते’
- ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले’
- सॉफ्ट सिग्नल नंतर बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय
- ‘माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

