टीम महाराष्ट्र देशा: मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे. अस म्हणत पकोड्याचा ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची पाठराखण खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेत अमित शहा यांनी सहभाग घेतला. राज्यसभेतील अमित शहांचे हे पहिलेच भाषण होते. या भाषणात शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
