बीड: राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे. अशीच एक घटना बीड येथील माजलगावात घडली. दोन भावात वाद होऊन प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले. या वादात लहान्या भावाने मोठ्या भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. ही घटना सायंकाळी घडली. या घटनेत शेख इर्शाद यांचा जागीच मुत्यू झाला.
ही घटना प्लॉटच्या वादातून घडल्याचे समोर आले. या जागेवरून त्या दोन्ही भावात वाद झाला. लहान भाऊ अर्षदने मोठा भाऊ इर्शादला तीक्ष्ण चाकू पोटात खुपसून त्याची हत्या केली. ही संपूर्ण घटना जागेच्या वादावरून घडली असल्याचे सांगितल्या जात आहे. आरोपी अर्षदला पोलिसांनी अटक केले आहे. त्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
राज्यात वाढत्या हिंसात्मक घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. या घटनावर सरकारने येत्या काळात काही उपाययोजना कराव्यात जेणेकरून त्यावर आळा बसेल. पोलिसांनी आणखीन सतर्क राहण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. येणाऱ्या काळात या घटना कमी होतील अशी अपेक्षा केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
