लातूर : लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण स्वतंत्र सभा घेण्याच्या परंपरेला छेद दिला गेला आहे. अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र सभा घेण्याची परंपरेला छेद दिल्याने सत्ताधारी सदस्यांकडून सभा तहकूब करण्यात आली. डिसेंबरमध्ये झालेल्या इतिवृत्त तयार नसल्याने या सभेला तहकूब करण्यात आले. पुढील सभा सोमवारी ८ मार्चला होणार आहे.
सभेचे इतिवृत्त नसणे व कायम केलेले इतिवृत्ती पुन्हा ठेवणे, ही बाब सभागृहाचा अपमान असल्याची सांगून सत्ताधारी सदस्य यांनी ही सभा गृह तहकूब करावा अशी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सभा तहकूब करत सोमवारी सभा घेण्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेकडून अर्थसंकल्पाच्या विषयवार स्वतंत्र सभा ठेवली. जाते पण या परंपरेला फाटा देत गुरुवारीच सभा उरकण्याचा प्रयत्न कारण्यात आला. या प्रयत्नाला सत्ताधारी सदस्यांनी विरोध करत स्वत्रंत सभा ठेवण्याची मागणी धरून लावलेली.
या मागणीला दाद देत अध्यक्षांनी ८ मार्चला सभेचे आयोजन केले आहे. दरम्यान गुरुवारी स्वतंत्र सभेची परंपरा मोडण्यात आल्याचे यावेळी सदस्यांकडून सांगण्यात आले. येणाऱ्या काळात पुन्हा अशी चूक होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असेही ते सांगत होते.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! अतिक्रमण हटवण्यासाठी मनपात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न
- हद्दच झाली! आईचे नाव बदलण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच
- महिला अधिकाऱ्यांनी पकडला दीड लाखांचा गुटखा
- जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २३ ठिकाणी टाकणार जलवाहिनी
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

