अबुधाबी : दुबई मध्ये सुरु असलेल्या आयपीएलची रंगत आता वाढताना दिसत आहे. सगळेच संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरताना दिसत आहेत. आयपीएलच्या 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सलग तीन सामने गमवल्यानंतर पंजाब किंग्जवर दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात पराभवाची साखळी तोडत मुंबई इंडियन्स विजयच्या रथावर बसली आहे.
मुंबईच्या टीमनं पंजाबचा 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सनं 136 रनचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या या विजयानंतर पॉईंट्स टेबलमधील रंगत आणखी वाढली आहे. या विजयासह मुंबईन प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत. प्रतिउत्तरात कॅरन पोलार्ड व जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 6 बाद 135 धावांवर रोखले. नाणेफेक जिंकत रोहितनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्याचा हा निर्णय बुमराह व पोलार्डने योग्य ठरवला.
मुंबईचा डाव
या सामन्यात हार्दिक पंड्या, कॅरन पोलार्डने आक्रमक फलंदाजी करत हा सामना सहज जिंकला. विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. मधल्या फळीतील सूर्यकुमार यादवनेही निराशा केली. क्वांटन डीकॉकने चांगली खेळी केली. मात्र, तोदेखील फक्त 27 धाव करू शकला. सौरभ तिवारीने आक्रमक फलंदाजी करत 37 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 45 धावा घेतल्या. पंड्या 30 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांवर नाबाद राहिला, तर पोलार्डने एक षटकार व एक चौकार फटकावताना नाबाद 15 धावा केल्या.
पंजाबचा डाव
पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने मनदीप सिंगच्या साथीत चांगली सुरुवात केली. मात्र, संघाच्या 36 धावा झाल्या असताना मनदीप बाद झाला. त्यानंतर फॉर्म मध्ये असलेला राहुल देखील पोलार्डचा बळी ठरला. पोलार्डने ख्रिस गेल याचाही अडसर दूर केला. त्याचवेळी एडन मार्करमने मात्र एक बाजू लढवत ठेवली. निकोलस पूरनही अपयशी ठरला. त्यानंतर दीपक हुडाने मार्करमला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, मार्करम अर्धशतकाजवळ आलेला असताना बाद झाला. त्याने 42 धावांच्या खेळीत 29 चेंडूत 6 चौकार फटकावले.
महत्त्वाच्या बातम्या
- अश्विनला बाद केल्यानंतर साऊदी आणि मॉर्गनने डिवचलं अन् चिडलेल्या अश्विनने…
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

