मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. राज्यपाल यांचं आज अभिभाषण होतं, अभिभाषण सुरू असताना अर्धवट सोडून राष्ट्रगीताची वाट न बघता राज्यपाल निघून गेले. राज्यपाल यांच्या विरोधात संजय दौंड यांनी अनोख आंदोलन केले. “खाली डोकं वर पाय” करत राज्यपालांचा निषेध केला.
सत्ताधारी आमदारांच्या व सभागृहातील गोंधळामुळे राज्यपालांना जावं लागले असेही सांगितले जात आहे. राज्य पालांचे आज भाष्य होतं. जनतेचे प्रश्न समस्या एकूण न घेता भाषण थांबवून गेले, असे बोलले जात आहे. तसेच दुसरीकडे यासोबत राज्य पालांच्या विरोधात मविआ आंदोलन होत आहे. “राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव” अशी घोषणाबाजी देखील झाली.
आज पहिल्यांदा विधी मंत्रीमंडळाच्या इतिहासात घडत आहे, ज्यामध्ये राज्यपाल भाषण सोडून गेले. एवढेच नव्हे तर राष्ट्रगीताची वाट देखील पाहिली नाही. एवढेच नव्हे तर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई व जोतिबा फुलेंचा सुद्धा अपमान केला असे बोलत सत्ताधारी पक्ष आक्रमक झाले. ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही केल्या गेल्या. एकीकडे शिवरायांच्या वक्तव्यावरून राज्यपालांचा निषेध केला जात आहे तर दुसरीकडे मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधकही आक्रमक होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

