Share

BREAKING – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.

मा. गो. वैद्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. मा.गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता निघणार आहे. अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान,1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते.

गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ‘सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक मा. गो. वैद्यांनी लिहिले आहे, ते नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्याची ई-आवृत्ती 6 एप्रिल 2015 रोजी प्रकाशित झाली होती. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!