Share

नक्षलवादी समर्थकांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोमिला थापर, प्रभात पटनाई, सतीश देशपांडे आणि अन्य मंडळींनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर दुपारी साडे तीनच्या सुमारास सुनावणी होणार आहे.

एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. मंगळवारी देशभरात एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची, फरिदाबाद, दिल्लीत छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

तेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा कश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!