औरंगाबाद : गंगापूर येथील नगर परिषद निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आयोगाच्या सुचनेनुसार शहराच्या नवीन प्रभागाचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वीचा वॉर्ड आता नाहीसा होऊन दोन वाॅर्डाचा एक प्रभाग होणार आहे. या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. यामध्ये एक मोठा बदल झाला आहे. नवीन नियमानुसार तीन नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत मोठा बदल होणार आहे.
बदलत्या प्रभागरचनेमध्ये काय काय बदल होणार याची धास्ती आता मावळत्या नगरसेवकांनी घेतली आहे. तर या नवीन प्रभाग रचनेमुळे नव्याने नगरसेवक होण्यासाठी निघालेल्या मंडळीना मात्र सोयीचे झाले आहे. यापूर्वी येथील नगरपरिषदेमधे १७ नगरसेवक होते. या सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ २१ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर नगरपरिषदेचा कारभार प्रशासक व मुख्याधिकारी पाहतील. अंदाजे मार्च-एप्रिल महिन्यात नगरपालिकेचा बिगुल वाजणार आहे.
सध्या राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणासह हा आराखडा आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत.
नगरसेवकांची संख्या होणार वीस
मागील नगरपरिषदेसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येबाबतचा निकष लावला होता. त्यामध्ये शहराची लोकसंख्या २७ हजार होती. तर निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार २५ हजार लोकसंख्येला २० सदस्य तर त्यापुढील ३ हजार लोकसंख्येसाठी १ सदस्य वाढणार आहे. त्यामूळे गंगापूर नगरपरिषदेसाठी तीन सदस्याची वाढ होत २० नगरसेवक होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अडचणीत?
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र
- दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर
- ‘राणेंना एवढे महत्त्व कशाला’; पेडणेकरांचा खोचक सवाल
- ‘तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, अजित पवारांना जातीयवादी…’

