🕒 1 min read
मुंबई : ‘शेरशाह’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिद्धार्थ ‘शेरशाह’या चित्रपटात कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणार आहे. तसंच या चित्रपटात त्यांची प्रेयसी डिंपल चीमा यांची भूमिका कियारा अडवाणी साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना विक्रम बत्रा यांच्या प्रेमकथेची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर सोशल मिडियावर याची भरभरुन प्रशंसा केली जाता आहेत. यातच बॉलीवूड सेलेब्रिटी देखील या चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी मागे राहिले नाहीत.
https://www.instagram.com/p/CRnpa1nr2D0/?utm_source=ig_embed&ig_rid=a22c81b6-b225-42e2-8b39-50f44d3b5025
अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट, करीना कपूर आणि अनन्या पांडे, सारा अली खान आणि विक्की कौशल यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यावेळी अक्षय कुमारने ट्विटर करत लिहिले की, “रील हिरो खर्या नायकाला काय श्रद्धांजली वाहू शकेल? परमवीर चक्र पुरस्कार कॅप्टन विक्रम बत्रा! तुम्ही आपल्या बलिदानाने आम्हाला जीवनासाठी प्रेरणा दिली. माझा वाढदिवस तुझ्याबरोबर शेअर करण्यासाठी स्वत: ला भाग्यवान समजतो,” असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
What tribute can a reel hero give to a real hero. Except that your sacrifice inspired us for life, Param Vir Chakra Awardee Captain Vikram Batra! Honoured to share my birthday with you. Sharing the trailer of #Shershaah,the story of your heroic sacrifice.https://t.co/XZpmNSvYsM
— Akshay Kumar (@akshaykumar) July 25, 2021
तर आलिया भट्टने ट्विटर करत लिहिले की, “अरे देवा! किती सुंदर ट्रेलर आहे. आमच्या कारगिल युद्ध नायकाची प्रेरणादायक कथा पाहण्यासाठी मी अजून प्रतीक्षा करू शकत नाही. शेरशाहच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, पाहण्याची अजून वाट पाहू शकत नाही! ”

जान्हवी कपूरने लिहिले, “असे धैर्य, शौर्य आणि उत्कटता नेहमीच प्रेरणा देते. ही प्रेरणादायक कहाणी आमच्या पर्यंत पडद्यावर आणल्याबद्दल शेरशाहच्या संपूर्ण टीमला प्रेम आणि शुभेच्छा. मी हे पाहण्यासाठी अजून वाट बघू शकत नाही.” असे म्हणत आपली उत्सुकता व्यक्त केली आहेत.

हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी मध्ये अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर तूफान व्हायरल होता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योद्धा जेव्हा शरण येत नाही…’, आ.धसांनी महिलेचे हॉटेल पाडल्यानंतर समर्थकांची पत्रकबाजी
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
