‘सगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच’ चिघळलेल्या आंदोलनादरम्यान बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट
नवी दिल्ली: मंगळवारी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये मात्र गेल्या दोन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आक्रमक रूप धारण केले आणि शेतकरी आंदोलनाला गलबत लागल. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला.
सारी ग़लती नेहरु और गांधी की है। ना आज़ादी मिलती, ना Republic Day होता।
— वरुण ???????? (@varungrover) January 26, 2021
दरम्यान बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय पटकथा लेखक वरुण ग्रोवरने ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वरुण ग्रोवरचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले, ‘सगळी चूक ही नेहरू आणि गांधीजी यांची आहे. ना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते ना प्रजासत्ताक दिवस असता’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
कालच्या हिंसाचाराच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.
वरुण ग्रोवरने नेटफ्लिक्सवरील सुपरहिट सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची पटकथा लिहिली आहे. त्यानंतर त्यांनी फॅन, उडता पंजाब, सोनचिडिया या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. वरुण ग्रोवरने ‘पेपर चोर’ हे पुस्तक देखील लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनुष्कानंतर आता करीनाचे बेबीबंपसोबत योगाचे फोटो व्हायरल !
- ‘महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, अरे कुठे फेडाल ही पापं?’
- ‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – अजित पवार
- जनतेशी मनमोकळा संवाद साधताना धनंजय मुंडे झाले भावूक
- ‘रोज वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

