Share

अनुष्कानंतर आता करीनाचे बेबीबंपसोबत योगाचे फोटो व्हायरल !

Published On: 

मुंबई: सध्या बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हि आपली दुसरी प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. या दरम्यान करीना नेहमीच समाज माध्यमे आणि वेगवेगळ्या अक्टीव्हिटी करताना दिसून आली. यावेळी असाच एक आपल्या बेबीबंपसोबतचा आकर्षक फोटो करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरुन शेअर केला आहे.

यामध्ये करीना योग करताना दिसत आहे. तर आपला फीट राहाण्याचा मंत्र प्रेग्नंसी मध्ये देखील आपण सोडला नसल्याचं जणू यामध्ये तिच्या चाहत्यांना सांगत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर करीनाच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

https://www.instagram.com/p/CKdTtYFpfYM/?utm_source=ig_web_copy_link

यात तिने एका फोटोमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. करंट मूड…अधिक स्ट्रेच असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने एका प्रसिद्ध ब्रॅण्डची जाहिरातदेखील केल्याचं दिसून येत आहे.

करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे गरोदरपणातील अनुभव ती ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकात लिहित आहे. करीनाचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. तैमूरच्या वाढदिवशी करीनाने या पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकात करीनाने डाएट ते मॉर्निंग सिकनेस आणि फिटनेसबद्दलही लिहिलं आहे.

दरम्यान, कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी त्यांचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय केला आहे. यात अनुष्का शर्मा हीने देखील आपला प्रेग्नंसी काळात थेट शीर्षासन करण्याचा फोटो शेअर केल्याने चाहते अवाक् झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!