Share

‘रोज वचवच करणारे संजय राऊत दिल्ली घटनेवर का बोलले नाहीत?’

Published On: 

मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. या हिंसाचारात अनेक शेतकरी तसेच पोलीससुद्धा जखमी झाले. या चिघळलेल्या परिस्थितीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हात उचला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.

दरम्यान, महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात ह्यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं?, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

तसेच रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!