Share

बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय- छगन भुजबळ

Published On: 

पुणे : महाराष्ट्रातील एनसीबीच्या कारवायांवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ‘मोदी सरकार गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी करत आहे,’ असा आरोप भुजबळांनी केला आहे. तसेच या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळालाय, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे, असे म्हणत त्यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावरही टीका केली आहे. तसेच बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय, असेही ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळ म्हणाले की,’महाराष्ट्र जसा विमानतळ, गोद्या, जेट्टी, उद्योगधंदे, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो बॉलिवूडसाठी जग प्रसिद्ध आहे. चित्रपट क्षेत्रात हॉलिवूडनंतर दुसऱ्या क्रमांकाचं काम बॉलिवूडचं आहे. या संपूर्ण बॉलिवूडलाच बदनाम करण्याचं काम सुरू आहे. तसेच बॉलिवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील बदनाम केलं जातंय. तसं करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं जातंय. अशा प्रकारचे खोटे आणि चुकीचे आरोप हे अधिकारी कसे करत आहेत? आरोप करणारेच लोक कसे चुकीचे आहेत हे आता सर्वांच्या समोर येतंय. त्यामुळेच भाजपविषयी जनतेच्या मनात राग निर्माण होतोय.’

दरम्यान, ‘मागील १५ दिवसांच्या गोष्टी पाहिल्या तर भारत सरकारच्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप विरोधी सरकारं जिथं आहेत तिथं तिथं अतिरेक करत आहेत. त्यामुळेच या सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत आणि जनतेला त्रास देत आहेत हे समोर येतंय. समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत हे सिद्ध झालंय. त्यांचे निकाहनामे बाहेर आलेत. नवाब मलिकही मुस्लीम आहेत. या प्रकरणात हिंदू मुस्लीम असण्याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकार महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांना त्रास देत आहे. हे सर्व उघड करण्याचं काम नवाब मलिक यांनी केले आहे,’ असेही यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!