Share

अंगद बेदीशी लग्नापूर्वी चर्चेत होती बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया

Published On: 

मुंबई : एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अंगद बेदी आणि अभिनेत्री नेहा या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अंगद बेदीशी तिने २०१८ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मात्र बॉडीवूडची चर्चेतील नेहाच्या तीन सेलिब्रिटींसोबत नाव जोडलेलं होत,त्यामुळे तिच्या बाबतची चर्चा रंगल्या होत्या.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नेहा धुपिया तिचा वाढदिवस साजरा करत आहे. नेहा लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. नेहाचा जन्म १९८० मध्ये कोची, केरळ येथे झाला. ती एका पंजाबी शीख कुटुंबातून आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक मोठ्या भूमिका पार पाडल्या आहेत. ज्याबद्दल ती नेहमीच चर्चेतही राहिली आहे. तिनं फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया युनिव्हर्सचा खिताबही आपल्या नावी केला आहे.

नेहा धुपियानं २०१८ मध्ये अंगद बेदीशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. ही जोडी पहिल्यांदा २०१७ मध्ये झहीर खान आणि सागरिकाच्या लग्नात एकत्र दिसली होती. मात्र आज हे जोडपं खूप छान एकत्र वेळ घालवत आहे. अंगद बेदीशी लग्न करण्यापूर्वी नेहानं ३ मोठ्या सेलेब्सना डेट केलं आहे. तिचं नाव युवराज सिंग, स्क्वॅश खेळाडू ऋत्विक भट्टाचार्य आणि जेम्स सिल्वेस्टर यांच्याशीही जोडलेलं होतं. ऋत्विकसोबत नेहाचं नातं १० वर्षे टिकलं. मात्र नंतर ही जोडी तुटली. त्यानंतर नेहा ३ वर्षे जेम्स सिल्वेस्टरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र हे दोघं वेगळे का झाले हे कोणालाच माहीत नाही.

नेहा आणि अंगदनं त्यांच्या लग्नाचे फोटो थेट सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या जोडप्याचं लग्न दिल्लीतील गुरुद्वारामध्ये झालं होतं. फक्त काही खास लोकांना या लग्नात बोलावण्यात आलं होते. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काही लोकांचं म्हणणं की नेहा लग्नापूर्वी गर्भवती झाली होती, त्यामुळे दोघांनाही घाईघाईत लग्न करण्याचं ठरवलं. मेमध्ये लग्न झाल्यानंतर तिने १८ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर नेहाला खूप ट्रोल केलं गेलं. मात्र तिनं यावर कोणतंही उत्तर दिले नाही.
नेहाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ज्यात’ कयामत: सिटी अंडर थ्रेट, शूट आउट अॅट लोखंडवाला, ‘गरम मसालासारख्या सर्वोत्तम चित्रपटांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!