जालना : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या इंदोरच्या ईगल सिडसच्या कंपनीच्या मालकांना इंडोरमध्ये जाऊन आम्ही त्यांना अटक करू.अशी घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. यावर भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी बोलणं सोपं असत, करणं अवघड. अस म्हणत नवाब मालिकांना कंपनीच्या मालकांला अटक करून दाखविल्यास परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने तुमचा सत्कार करेल. अस ओपन चॅलेंज त्यांना एका पत्राद्वारे दिले आहे.
इंदोरच्या ईगल सीड्स या कंपनीने राज्यात उगवण क्षमता नसलेल्या लाखो क्विंटलच्या सोयाबीन बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी या कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लाखो हेक्टरवरचे सोयाबीनचे बियाणे उगवले नाही बियाणे वाया गेले त्याचबरोबर खत आणि श्रमही वाया गेले. शेतकऱ्यांचं एक वर्षाचे पूर्ण पीक वाया गेले एकदा दोनदा तीनदा बियाणे पेरून उगवले नाही.
यावर परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नवाब मलिक यांनी सीड्स कंपनीच्या मालकाला अटक करण्यासाठी परभणीचे पोलीस पथक नेमून त्यांना इंडोरमधून अटक करू असे म्हंटले आहे. या भूमिकेचे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वागक्त करत "वादा किया है तो निभाना पडेगा …ईगल सिडसच्या मालकाला अटक करून दाखवावी , मी परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने त्यांचा भर चौकात सत्कार करेनअसे आव्हान नवाब मलिक यांना दिले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाचेही लाखो क्विंटल बियाणे बोगस निघाले आहे. ईगल कंपनी बरोबरच महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाने देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.त्यामुळे महामंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यावरही गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणीही नवाब मलिक यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी; भाजप खासदाराचा धोनीला सल्ला
रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन; ५० कोटी डोस तयार करणार
मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

